मास्क घेताना घ्या ही काळजी, नाहीतर तुमचीही होऊ शकते फसवणूक

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. अशाच अत्यावश्यक सेवेकडून कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. मात्र काही दुकानदार संधीचा फायदा घेऊन बाजारत बनावट मास्क, सॅनिटायझरचा काळाबाजार करत असल्याचे पोलिसांच्या अनेक कारवाईतून पुढे आले आहे. नुकताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोअरपरळ येथून बनावट मास्कचा २१ लाखाचा साठा जप्त केला आहे. त्याच्याजवळून पोलिसांनी एन-९५ बनावट मास्क हस्तगत केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कुठूनही मास्क किंवा साहित्य विकत घेतान काळजी घ्या, घेतलेली वस्तू पडताळू पहा, अन्यथा तुम्हचीही फसवणूक होऊ शकते.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे १११८ नवे रुग्ण, दिवसभरात ६० जणांचा मृत्यू

कोरोनाच्या विषाणूंपासून बचावासाठी मास्क आणि सेनिटायझरचा वापर देशात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सेनिटायझर आणि मास्क तयार करणाऱ्या अनेक कंपन्या कोरोनाच्या काळात नावारूपाला आलेल्या आहेत. देशात सध्या सेनिटायझर आणि मास्कची वाढती मागणी बघून नामांकित कंपन्यांची नावे वापरून मोठ्या प्रमाणात बनावट मास्क आणि सेनिटायझर बाजारात दाखल होत आहेत. अशाच एका नामांकित कंपनीचे नाव वापरून बनावट एन – ९५ मास्कची विक्री करणाऱ्या वितरकाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून पोलिसांनी २१ लाख ३९ हजार रुपये किंमतीच्या बनावट एन-९५ मास्कचा (N-95 Mask) साठा हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने केली आहे. त्यात पोलिसांनी सफदर हुसेन मोहम्मद जाफर मोमीम (४०) याला अटक केली असून तो वितरक आहे. भिवंडीत राहणारा सफदर हा कोरोना सुरू झाल्याच्या काळापासून बनावट मास्कची विक्री करीत असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचाः- महाराष्ट्रात लॉकडाऊन  ‘या’ तारखेपर्यंत वाढवला; नव्या आदेशात पाहा काय सुरु-काय बंद

या टोळीतला मोमीम हा फक्त मोहरा असून त्याच्या मागे मुख्यआरोपी हे वेगळेच असल्याचे तपासात पुढे आले आहे. हे मास्क भिवंडीत कुठे बनले, कुठेकुठे त्याची विक्री केली जात आहे. याचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली.  

पुढील बातमी
इतर बातम्या