दारूखाना येथील गोडाऊनमधून कोट्यावधी रुपयांचे N-95 मास्क जप्त


दारूखाना येथील गोडाऊनमधून कोट्यावधी रुपयांचे N-95 मास्क जप्त
SHARES
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक असणारे मास्क आणि सॅनिटायजर्स यांचा साठा करून त्याची चढ्या दरात विक्री करणाऱ्या अनेकांवर मुंबई पोलीस कारवाई करत आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष 3 ने  दारूखाना परिसरात सापळा रचून छापेमारी केली असता कोट्यावधी रुपयांचे  एन 95 मास्क आणि 3 फ्लाय सर्जिकल मास्क जप्त करण्यात आलेत.



मुंबईतल्या रे रोड परिसरात काही जण गोडाऊनमध्ये मास्क आणि 3 फ्लाय सर्जिकल मास्कचा काळाबाजार करत  असल्याची माहिती गुन्हे शाखा 3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार नितीन पाटील यांच्या पथकाने सापळा रचून गोडाऊनवर कारवाई केली असता. गोडाऊनमध्ये 1 कोटी 27 लाख रुपयांचे एन 95 मास्क व  7 लाख 75 हजार रुपयांचे 3 फ्लाय सर्जिकल मास्क पोलिसांना सापडले. या गोडाऊनवर मूर्ताझा अन्सारी या 37 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत या वस्तूची साठवणूक करण्याबाबत त्याच्याजवळ कोणतेही कागदपञे नसल्याचे निदर्शनास आले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सभोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन आरोपी आणि त्याचे साथीदार हा मास्क चढ्या दराने विकण्याच्या पविञात असल्याचे कळते. मास्क आणि सॅनिटायजर्स या दोन्ही गोष्टी जीवनावश्यक वस्तूमध्ये येत असल्याने त्यांची साठवणूक करणे बेकायदेशीर आहे. या आधी मुंबई पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करत 15 करोड रुपयांचे मास्क जप्त केलेले होते.दरम्यान कारवायांच सत्र दिवसेंदिवस सुरूच असल्याच समोर आलय.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा