भिवंडीत अल्पवयीन मुलीवर घरात घुसून हल्ला, एकतर्फी प्रेमातून घटना

तरुणाने मुलीच्या आईसमोरच तिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर त्याने स्वत:चाही गळा कापला.

भिवंडीत अल्पवयीन मुलीवर घरात घुसून हल्ला, एकतर्फी प्रेमातून घटना
SHARES

भिवंडीमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या घरात घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. तरुणाने मुलीच्या आईसमोरच तिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर त्याने स्वत:चाही गळा कापला. या घटनेत दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर कळव्यामधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भिवंडीतील फेनागाव परिसरात मंगळवारी सायंकाळी पाच-सहाच्या सुमारास ही घटना घडली.

आरोपी तरुण 18 वर्षांचा असून तरुणी अल्पवयीन आहे. आरोपीचं मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. तो नेहमीच तिची छेड काढायचा. मुलीच्या नातेवाईकांनी याची माहिती तरुणाच्या कुटुंबालाही दिली होती. याचाच राग मनात ठेवून आरोपी तरुणाने धारदार शस्त्रासह मुलीच्या घरात प्रवेश केला. मुलीच्या आईसमोरच तिच्या गळावर सपासप वार केले. त्यानंतर स्वत:च्या गळ्यावरही वार करुन तिथून पळ काढला.

यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. शेजाऱ्यांनी तात्काळ दोघांनाही भिवंडीतील एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र दोघांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्यांना कळवा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.  दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. भिवंडी शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.हेही वाचा -

मास्क न लावणाऱ्या १३३० जणांवर कारवाई

मुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा