लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान झालेल्या वडापाव विक्रेत्याने केली आत्महत्या

मुंबईत कोरोनाचे संक्रमण (Coronavirus) सुरू होताच मार्च महिन्यात सरकारने सर्वत्र लॉकडाऊन (lockdon) जाहिर केले.  या लॉकडाऊनमुळे मोठ्या कंपन्यांचे नुकसान झाले. त्यामुळे अनेकांची नोकरी सुटली, काहींनी गाव गाठले. मात्र हातावरचे पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली. घाटकोपर (Ghatkoper )मध्ये देखील धंद्यात मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे एका वडापास विक्रेत्याने आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- पुन्हा लाॅकडाऊन होईल या भीतीने ‘इतक्या’ तळीरामांनी केले दारूच्या परवान्यासाठी अर्ज

घाटकोपरच्या गरोडिया नगर परिसरात रहाराणाऱ्या सदानंद मुथा नाईक (६०) याचा वांद्रे येथे वडापावचा स्टाॅल (Vadapav) होता. मात्र मुंबईत कोरोनाचे संक्रमाण वाढत असल्याचे पाहताच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी राज्यभरात  लॉकडाऊन जाहिर केले. त्यामुळे मार्च ते आॅगस्ट या चार महिन्यात हातावर पोट असलेल्या सर्वच धंदे वाल्यांना घरी बसावे लागले. यापूर्वी केलेल्या व्यवसायातून त्यांनी चार महिने कुटुंबियांचा उदर निर्वाह केला. मात्र अनेक जणां पुढे आर्थिक टंचाई आणि कर्जाचा डोंगर उभा राहिला. सदानंद हेही याच परिस्थितीतून जात होते. अखेर अंगावरील कर्जाचा भार वाढत गेल्याने सदानंद यांनी टोकाचे पाऊल उचलले.

हेही वाचाः- Exclusive राज्यातील मद्यविक्री ३७ टक्क्यांनी घटली...

मंगळवारी सदानंद यांनी त्यांच्या राहत्या घराच्या बाथरुममधील खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी सदानंद यांच्या मुलाचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून त्यात त्याने कोणावरही संशय नसल्याचे म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. नाईक यांचा कोरना अहवाल निगेटीव्ह आला असून त्यांच्या मृतदेहावर लवकरच शवविच्छेदन करण्यात येईल, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या