पुन्हा लाॅकडाऊन होईल या भीतीने ‘इतक्या’ तळीरामांनी केले दारूच्या परवान्यासाठी अर्ज

मद्य परवान्याविना दारू मागवता येत नसल्यामुळे ही खटपट तळीराम करत आहेत. काहीका होईना मात्र तळीरामांच्या या खटाटोपामुळे राज्याच्या तिजोरीत भर पडली आहे

पुन्हा लाॅकडाऊन होईल या भीतीने ‘इतक्या’ तळीरामांनी केले दारूच्या परवान्यासाठी अर्ज
SHARES

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण (Coronavirus) दिवसेंदिवस वाढत असताना, नागरिकांमध्ये सरकार पून्हा लाॅकडाऊन करतयं की काय, अशी चर्चा सुरू आहे. लाॅकडाऊनमध्ये दारूसाठी तळीरामांना किती चपला झिजवाव्या लागल्या याची चांगलीच कल्पना त्यांना आहे. त्यामुळे जरी लाॅकडाऊन झाले तरी आॅनलाईन दारू (Online Alcohol)मागवता यावी म्हणून तब्बल दीड लाखाहून अधिक तळीरामांनी दारू परवान्यासाठी अर्ज केले आहेत. मद्य परवान्याविना दारू मागवता येत नसल्यामुळे ही खटपट तळीराम करत आहेत. काहीका होईना मात्र तळीरामांच्या या खटाटोपामुळे राज्याच्या तिजोरीत भर पडली आहे.

हेही वाचाः-आयपीएलच्या पहिल्या सामन्यानं मोडला 'हा' विक्रम

लॉकडाऊन(Lockdon)च्या काळात सरकारने आता घरपोच दारू विक्राली परवानगी दिली असली. तरी आॅनलाईन दारू मागवताना दारू पिण्यासाठी लागणारा परवाना असणे आवश्यक आहे, हे तुम्हाला माहित आहे का? जर हा परवाना नसेल तर तुम्हाला दारू मागवता येणार नाही. सध्या महाराष्ट्रात मद्यउत्पादन, मद्यविक्री आणि मद्यसेवन यासाठी बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट लागू आहे. याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क खाते ( Maharashtra State Excise) करते. त्यामुळेच दारू पिण्यासाठी परवाना असणे गरजे असल्याचे लक्षात घेऊन लाखो लोकांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रानं दारू विकण्यास परवानगी दिली आणि दारूच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. यातून सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला. हे लक्षात घेऊनच महाराष्ट्र सरकारनं यावर नामी उपाय शोधलाय. दारू घरपोच देण्यास विक्रेत्यांना परवानगी दिलीय. मात्र, यासाठी काही अटीही सरकारनं ठेवल्यात. मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ अंतर्गत ज्या दारू विक्रेत्यांकडे परवाना आहे, तेच सरकारनं घालून दिलेल्या अटींच्या अधीन राहून दारू घरपोच देऊ शकतात. १ एप्रिलपासून ते १८ सप्टेंबरपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मद्य परवान्यासाठी १ लाख ५६ हजार ०८५ जणांनी अर्ज केले होते. त्यातील १ लाख ५० हजार ९५५ जणांना परवानगी देण्यात आलेली आहे.  २० सप्टेंबर रोजी राज्यातील ४ हजार ५९० जणांनी घरपोच दारू या सेवेचा लाभ घेतलेला आहे.

 हेही वाचाः-कोविड सुरक्षेचे प्रोटोकाॅल पाळा, नाहीतर…, मनसेचा मालिका निर्मात्यांना इशारा

 राज्यात १५ मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्य विक्री सेवा देण्यात येत आहे. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तथापी IOS प्रणलीबाबत संकेत स्थळावर अडचणी होत असल्याचे निर्देशनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दुर करण्यात येत आहेत तो पर्यन्त मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निर्देशनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दरोराज मद्य सेवन परवाने Offline पध्दतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मद्य सेवन परवाने एक वर्षाकरीता रु.१००/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.१०००/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकताता. तरी मद्य विक्री दुकानासमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय