दारूच्या नशेत महिला काॅन्स्टेबलचं असभ्य वर्तन

दारूच्या नशेत तिचे तेथील नागरिकांशी क्षुल्लक कारणांवरून वादा झाला असता. महिला काॅन्स्टेबलने नागरिकांशी भांडण केले.

दारूच्या नशेत महिला काॅन्स्टेबलचं असभ्य वर्तन
SHARES

जुहूत चक्क  एका महिला पोलिस काँन्स्टेबलने मुंबई पोलिस दलाची अब्रु वेशीवर टांगण्याचा प्रकार घडला आहे.  पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला काँन्टेबलने दारूच्या नशेत असभ्य वर्तन केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी संबधित महिला काॅन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचाः- सुशांत प्रकरणात बिहार पोलिसांनी दखल देऊ नये – सुप्रीम कोर्ट

मुंबईच्या जुहू पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली प्रियांंका (नाव बदललं आहे. ) २४ जुलैला ही जुहूच्या इस्काॅन टेम्पल येथे डे शिफ्टला ड्युटीवर होती. सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर तिने घरी जाणे अपेक्षित होतं. मात्र तिने तसे न करता ती मोरागांव, रुईया पार्क, जुहू येथे जाऊन दारू पियाली. दारूच्या नशेत तिचे तेथील नागरिकांशी क्षुल्लक कारणांवरून वादा झाला असता. महिला काॅन्स्टेबलने  नागरिकांशी भांडण केले. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.

हेही वाचाः- Mumbai Rains : शुक्रवारी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

महिला पोलिसांच्या या  असभ्य वर्तनाची गंभीर दखल  वरिष्ठांनी  घेतली. खाकीवर अशाप्रकारे नागरिकांशी असभ्य वर्तन करणे पोलिस दलाच्या शिस्तीस अशोभनीय असल्याचा शेरा वरिष्ठांनी नोंदवत त्या महिला पोलिस काॅन्स्टेबलला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे.    

Read this story in हिंदी
संबंधित विषय