Advertisement

मुंबईत कोरोनाचे १६२८ नवे रुग्ण, ४७ जणांचा दिवसभरात मृत्यू

मंगळवारी दिवसभरात १६६९ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ५२ हजार २०४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे १६२८ नवे रुग्ण, ४७ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात मंगळवारी कोरोने ३९२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत मंगळवारी दिवसभरात १६२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्गमुंबईतील पहिलीच केस

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४७ रुग्ण दगावले आहेत. तर २१ सप्टेंबर रोजी ३६ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २० सप्टेंबर रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे १६२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ८७ हजार ७७८ इतकी झाली आहे. तर मंगळवारी दिवसभरात १६६९ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ५२ हजार २०४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ रॉयल चॅलेंजर्सची नवी जर्सी

भारतापुढील कोरोना विषाणूचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. देशात दररोज हजारो रुग्णांना कोरोनाचे संक्रमण होत आहे. अशातच जास्त घनता असणाऱ्या शहरांचा सर्वाधिक समावेश आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, पालघर, आदी जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा