Advertisement

कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ रॉयल चॅलेंजर्सची नवी जर्सी

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ ‘माय कोव्हिड हिरोज’ लिहिलेली जर्सी घालून मैदानात उतरणार आहेत.

कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ रॉयल चॅलेंजर्सची नवी जर्सी
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ ‘माय कोव्हिड हिरोज’ लिहिलेली जर्सी घालून मैदानात उतरणार आहेत.

पत्रकार परिषदेत ही नवीन जर्सी दाखवण्यात आली. यावेळी विराट कोहली म्हणाला की, ज्यांनी स्वतःची पर्वा न करता निस्वार्थीपणे दुसऱ्यांचा विचार केला त्या कोरोना योद्ध्यांना समर्पित ही नवीन जर्सी आहे. हा आमच्याकडून त्यांच्यासाठी सलाम आहे. ही जर्सी घालणं आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे.

आरसीबीचे चेअरमन संजीव चुडीवाला म्हणाले की, खेळाडू स्पर्धेदरम्यान आणि सरावाच्या वेळी या जर्सीमध्ये दिसतील. पहिल्या सामन्यात घातलेल्या जर्सीचा लिलाव होईल व त्यातून येणारी रक्कम गिव्ह इंडिया फाउंडेशनला देण्यात येईल. आरसीबी मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर हॅशटॅग ‘माय कोव्हिड हिरोज’ आणि ‘रिअल चॅलेंजर्स’ ही मोहीम चालवत आहे. या मोहिमे अंतर्गत कोरोना संकटात समाजसेवा करणाऱ्या योद्ध्यांची कहानी दाखवली जात आहे.



हेही वाचा -

IPL 2020: 'असा' आहे मुंबई इंडियन्सचा संघ

IPL 2020: 'मुंबई'नं फॅन्ससाठी शेअर केला 'तो' व्हिडिओ; पाहिलात का?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा