Advertisement

IPL 2020: 'असा' आहे मुंबई इंडियन्सचा संघ


IPL 2020: 'असा' आहे मुंबई इंडियन्सचा संघ
SHARES

इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा युएईला खेळवण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व संघ युएईला दाखल झाले आहेत. शनिवारी प्रथम सामना गटविजेता संघ मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किग्स यांच्यात रंगणार आहे. आयपीएलसाठी मुंबईचा संघ ही युएई रवाना झाला असून, कसून सराव करत आहे.

यंदा आयपीएलच्या १३ व्या हंगामानिमित्त मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला आहे. यंदा मुंबईच्या संघात अनेक खेळाडुंची आदला-बदल करण्यात आली आहे. त्यानुसार काही फलंदाज, गोलंदाज व अष्टपैलू खेळाडूंना मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलं आहे.

मुंबईचा संघ: 

BatsmenBowlersAll-RoundersWicket Keep
Rohit Sharma (C)Dhawal KulkarniAnukul RoyAditya Tare
Anmolpreet SinghDigvijay Deshmukh
Hardik PandyaIshan Kishan
Mohsin KhanJasprit BumrahKrunal Pandya
Saurabh TiwaryJayant YadavPrince Balwant Rai Singh
Suryakumar YadavRahul ChaharKieran Pollard
Chriss LynnJames Pattison

Quinton de KockMitchell McClenaghan

Sherfane RutherfordNathan Coulter-Nile


Trent Boult


यंदा हा संघ मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनीच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. आयपीएलच्या १२ व्या हंगामात  मुंबई इंडियन्सने जिंकला होता त्याशिवाय, १०० सामने जिंकणारा हा आयपीएलचा पहिला संघही ठरला आहे. यंदा आयपीएलच्या १३ व्या हंगामात मुंबईचे ५६ सामने होणार आहेत. 

आपल्या फॅन्ससाठी मुंबई इंडियन्सने एक अतिशय भावनिक असा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सामने सुरू असताना चाहत्यांची अनुपस्थिती कशाप्रकारे जाणवेल याबद्दल सांगण्यात आले आहे. स्टेडिअममध्ये फॅन्स असतानाचा माहोल कसा होता ते या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. त्याचबरोबर आता प्रेक्षकांविना खेळण्यात येणाऱ्या सामन्यात काय बदल असतील हेदेखील सांगण्यात आलं आहे.

'तुम्ही (चाहते) मुंबईत आणि आम्ही (खेळाडू) दुबईत असं अंतर असलं तरी त्याने आपलं प्रेम कमी होणार नाही. तुम्ही यंदाच्या आयपीएलमध्ये घरातूनच आमच्या संघाचा बारावा खेळाडू बना आणि आम्हाला आधीसारखाच पाठिंबा द्या', असं भावनिक आवाहन या व्हिडीओतून करण्यात आलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement