Advertisement

IPL 2020: 'मुंबई'नं फॅन्ससाठी शेअर केला 'तो' व्हिडिओ; पाहिलात का?


IPL 2020: 'मुंबई'नं फॅन्ससाठी शेअर केला 'तो' व्हिडिओ; पाहिलात का?
SHARES

इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा युएईला खेळवण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व संघ युएईला दाखल झाले आहेत. शनिवारी प्रथम सामना गटविजेता संघ मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किग्स यांच्यात रंगणार आहे. आयपीएलसाठी मुंबईचा संघ ही युएई रवाना झाला असून, कसून सराव करत आहे. या दरम्यान मुंबई इंडियन्सनं एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आपल्या फॅन्ससाठी मुंबई इंडियन्सने एक अतिशय भावनिक असा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सामने सुरू असताना चाहत्यांची अनुपस्थिती कशाप्रकारे जाणवेल याबद्दल सांगण्यात आले आहे. स्टेडिअममध्ये फॅन्स असतानाचा माहोल कसा होता ते या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. त्याचबरोबर आता प्रेक्षकांविना खेळण्यात येणाऱ्या सामन्यात काय बदल असतील हेदेखील सांगण्यात आलं आहे.

'तुम्ही (चाहते) मुंबईत आणि आम्ही (खेळाडू) दुबईत असं अंतर असलं तरी त्याने आपलं प्रेम कमी होणार नाही. तुम्ही यंदाच्या आयपीएलमध्ये घरातूनच आमच्या संघाचा बारावा खेळाडू बना आणि आम्हाला आधीसारखाच पाठिंबा द्या', असं भावनिक आवाहन या व्हिडीओतून करण्यात आलं आहे.

मुंबईचा संघ युएई मध्ये रवाना झाला तेव्हा तिथं जाणाऱ्या अनेक खेळाडूंनी मास्क आणि पीपीई कीट परिधान केले होते. त्यामुळे काही खेळाडू ओळखूदेखील आले नाहीत. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवर २०१९ आणि २०२० असे दोन फोटो पोस्ट करण्यात आल्याने त्यापैकी काही खेळाडू कोण आहेत कळू शकलं.

सध्या मुंबईचा संघ कसून सराव करताना दिसतो आहे. त्याचेही अनेक व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहेत. तसेच यंदाच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने नवीन जर्सी तयार करून घेतली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा