Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला अलर्ट

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस (Monsoon) कोसळला. त्यामुळे मुंबई अक्षरश: जलमय झाली होती. मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. आता हवामान खात्यानं (IMD) दिलेल्या इशारानुसार या आठवड्यात देखील मुसळधार पाऊल पडण्यची शक्यता आहे.

शनिवार रविवार मुंबईत पाऊस (Mumbai Rains) विश्रांती घेतली होती. पण दक्षिण पश्चिम मान्सून पुन्हा किनारपट्टीवर सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्यानं मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तिन दिवस Yellow Alert दिला आहे. तर सोमवारी ढगाळ वातावरण असेल आणि पावसाच्या तुरळक सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा : हँगिंग गार्डन परिसरात लँडस्लाईड, 'हे' रस्ते वाहतुकीसाठी ३ महिने बंद

यासोबतच विदर्भ आणि किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असेल आणि मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी बरसतील असं सांगण्यात आलं आहे. किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पण मुंबईसह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

४ ते ६ ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसानं मुंबईसह उपनगरांमध्ये नागरिकांची दाणादाण उडाली. अनेक घरांमध्येही पाणी शिरलं. तर राज्यातील अनेक नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र पुन्हा तीन दिवस पावसानं दांडी मारल्यानं स्थिती नियंत्रणात आली. आता पुन्हा एकदा पुढचे तीन दिवस अलर्ट जारी करण्यात आला आहे.


हेही वाचा

धरणांतील पाण्याची पातळी पोहोचली ५० टक्क्यांवर, पाणीकपात सुरूच राहणार

Mumbai Rains: ११ आॅगस्टनंतर वाढणार पावसाचा जोर! स्कायमेटचा अंदाज

पुढील बातमी
इतर बातम्या