Advertisement

म्हणून महापालिकेने केली मुंबईत पाणी साचण्याची व्यवस्था, भाजपची टीका

लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत पाणी साचलं पाहिजे अशी व्यवस्था यंदाही मुंबई महापालिकेने केलेली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, अशी उपरोधिक टीका भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी मुंबई महापालिकेवर केली आहे.

म्हणून महापालिकेने केली मुंबईत पाणी साचण्याची व्यवस्था, भाजपची टीका
SHARES

लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत पाणी साचलं पाहिजे अशी व्यवस्था यंदाही मुंबई महापालिकेने केलेली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, अशी उपरोधिक टीका भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी मुंबई महापालिकेवर केली आहे. मुंबईत मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. परिणामी मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. त्यावरून प्रसाद लाड यांनी महापालिका प्रशासनाला लक्ष्य केलं आहे. (bjp leader and mlc prasad lad criticised bmc over flood in mumbai during heavy rain)

आपल्या ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये प्रसाद लाड म्हणतात, मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलंय. याला मुंबईत पडणारा मुसळधार पाऊस आणि कोरोना जबाबदार आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत पाणी साचले पाहिजे अशी व्यवस्था यंदाही @mybmcSWD केलेली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. तेव्हा सर्वांनी घरीच राहा. गरम पाणी प्या.

बुधवारी पावसाचा जोर अधिक होता. या दिवशी १२ तासात पडलेल्या पावसानं तर दक्षिण मुंबईतील ४६ वर्षांचा रेकॉर्ड तोडला. कुलाबा वेधशाळेनं १२ तासात २९३.८ मिमी पावसाची नोंद केली. ऑगस्टमध्ये गेल्या २४ तासात पडलेल्या पावसानं उच्चांक गाठला आहे. १९७४ नंतर इतका पाऊस कोसळला. यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं. 

हेही वाचा - मुसळधार पावसाचा इशारा! एनडीआरएफच्या १६ टीम तैनात

मुसळधार पावसासोबतच शहरात जोरदार वारे वाहत होते. परिणामी सखल भागात ठिकठिकाणी पाणी तुंबलं, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील २०० हून अधिक झाडे उन्मळून पडली. रस्त्यावरील गुडघ्याभर पाण्यात वाहने अडकून पडली, तर ट्रॅकवरही पाणी साचल्याने लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी एनडीआरफच्या जवानांची मदत घ्यावी लागली. 

मुंबईत बुधवारी ताशी १०१ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत होते. हे एक प्रकारचं वादळच होतं. केवळ दक्षिण मुंबईतच हे वादळ होतं. कुलाबा ते नरिमन पॉइंट परिसराला पावासाने अक्षरश: झोडपून काढलं. मुंबईत फक्त ४ तासांत ३०० मिमी पाऊस पडला. मी ३० वर्षांपासून मुंबईत आहे. २६ जुलैलाही मी मुंबईत होतो. पण असा पाऊस कधीच बघितलेला नाही, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली होती.

हेही वाचा - “ही तर नैसर्गिक आपत्ती, मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपये द्या”

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा