Advertisement

धरणांतील पाण्याची पातळी पोहोचली ५० टक्क्यांवर, पाणीकपात सुरूच राहणार


धरणांतील  पाण्याची पातळी पोहोचली ५० टक्क्यांवर, पाणीकपात सुरूच राहणार
SHARES

आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या धुवाँधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाण्याची पातळी ५० टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. विशेष म्हणजे केवळ ४८ तासांत १ लाख ८ हजार दशलक्ष लिटरने (एमएलडी) पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.  त्यामुळे धरणातील पाणीसाठा ७ लाख ८ हजार १५३ दशलक्ष लिटरवर जाऊन पोहोचला आहे. 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. धरणं पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून साडेसात लाख दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच मुंबईतील नागरिकांना आरामात वर्षभर पाणीपुरवठा करता येईल. त्यामुळे जोपर्यंत ही धरणं पूर्ण क्षमतेने भरत नाहीत, तोपर्यंत महापालिकेकडून करण्यात येणारी २० टक्के पाणीकपात सुरूच राहणार आहे.

धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने विहार व तुळशी हे दोन तलाव काही दिवसांपूर्वीच ओसंडून वाहू लागले आहेत. अप्पर वैतरणा, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा व भातसा ही महत्त्वाची धरणं अजूनही काठोकाठ भरायची आहेत. भातसा तलाव ५१ टक्के भरला आहे. या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता ३ लाख ६५ हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. या तलावातून मुंबईला दररोज सर्वाधिक १८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मोडकसागर ५८ टक्के, तर मध्य वैतरणा ५० टक्के भरला आहे. अप्पर वैतरणा व तानसामध्ये अनुक्रमे २९ व ४५ टक्के इतका पाणीसाठा आहे. 


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा