पिकअप टायमिंगला रेल्वेत गर्दी, कर्मचाऱ्यांसाठी पालिका घेऊ शकते ‘हा’ निर्णय

शहरातील कोरोनाव्हायरसच्या संख्येत वाढ झाल्यानं बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालयीन वेळ बदलण्याचा विचार करत आहे, असं वृत्त मिड डेनं दिलं आहे.

अत्यावश्यक सेवेत असलेल्यांसाठी राज्य सरकारनं रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. फक्त अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या रेल्वेत सोशल डिस्टसिंगचे मात्र तीन तेरा वाजलेले पाहायला मिळाले. यासंदर्भात अनेकांनी तक्रारी देखील केल्या होत्या. मर्यादित लोकांसाठी सेवा असली तरी रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होत होती.


Mumbai Local Train: बँक, पोर्ट ट्रस्ट, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही करता येईल लोकल प्रवास


रेल्वेनं यापूर्वी १ जुलैपासून शहरातील सुमारे ३०० अतिरिक्त उपनगरीय गाड्या पुन्हा सुरू केल्या. पण काही प्रवाशांनुसार, रेल्वेमध्ये सोशल डिस्टनसिंगचं पालन कठिण आहे. कारण पिकअप टायमिंगला ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते.

मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर मार्चमध्ये थांबवण्यात आली होती. पण पश्चिम आणि मध्य रेल्वेनं १५ जूनपासून अत्यावश्यक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सीआर चालवत असलेल्या २०० गाड्यांपैकी (१०० डीएन आणि १०० यूपी) त्यापैकी १३० सीएसएमटी ते कल्याण / कर्जत / डोंबिवली / ठाणे दरम्यान मुख्य मार्गावर धावत आहेत. तर सीएसएमटी ते पनवेल दरम्यान हार्बर मार्गावर ७० सेवा चालवल्या जात आहेत. २०० गाड्यांमध्ये आणखी १५० गाड्या जोडल्या जातील.


हेही वाचा

Mumbai Local Trains : ‘या’ कर्मचाऱ्यांना करता येईल आता लोकलने प्रवास, रेल्वेची परवानगी

भारतीय रेल्वेच्या १०९ मार्गांवर १५१ धावणार खासगी ट्रेन

पुढील बातमी
इतर बातम्या