Advertisement

mumbai local trains : ‘या’ कर्मचाऱ्यांना करता येईल आता लोकलने प्रवास, रेल्वेची परवानगी

मध्य रेल्वेने ३ जुलै २०२० रोजी परिपत्रक काढत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

mumbai local trains : ‘या’ कर्मचाऱ्यांना करता येईल आता लोकलने प्रवास, रेल्वेची परवानगी
SHARES

मध्य रेल्वेने ३ जुलै २०२० रोजी परिपत्रक काढत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच (central railway allowed travel to central government employees by mumbai local trains) राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून या संदर्भातील विनंती केली होती.

याबाबत काढलेल्या परिपत्रकात मध्य रेल्वेने म्हटलं आहे की, राज्य सरकारच्या मागणीनुसार तसंच रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या परवानगीनुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन चालवण्यात येत आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांना तिकीट/ पास उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित आस्थापनातील अधिकृत ओळखपत्र उपलब्ध करून द्यावं. 

म्हणजेच पुढील आस्थापनांमध्ये, कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकृत ओळखपत्रावर लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास मुभा असेल. या कार्यालयांची यादी पुढीलप्रमाणे:

  • बृहन्मुंबई महानगरपालिका 
  • ठाणे महानगरपालिका
  • वसई-विरार महानगरपालिका
  • पालघर महानगरपालिका
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
  • मिरा-भाईंदर महानगरपालिका
  • नवी मुंबई महानगरपालिका
  • मुंबई पोलीस, बेस्ट आणि मंत्रालय
  • सर्व सरकारी/खासगी रुग्णालयात काम करणारे कर्मचारी
  • मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण (MRVC) कर्मचारी
  • अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता दिलेले कर्मचारी
  • सैन्यदल कर्मचारी, केंद्र सरकारचे कर्मचारी आणि राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी
  • प्राप्तिकर विभाग, जीएसटी, जकात, पोस्ट विभागातील कर्मचारी
  • मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्यायालय आणि राजभवनचे कर्मचारी
  • रेल्वे तसंच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या आस्थापनातील रचनात्मक काम करणारे कर्मचारी

या कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेन प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळांमधील बदलांच्या अटी आणि शर्तींसह लोकल प्रवासाची परवानगी राहील. लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आलेली कार्यालये /आस्थापना यांच्या कार्यालय प्रमुखांनी आवश्यकता असलेल्या कर्मचाऱ्यांना पास देणं आवश्यक राहील. राज्य शासनाने या आधी केंद्र शासनाच्या कार्यालयांच्या उपस्थितीसंदर्भात ज्या अटी घातल्या होत्या, त्या अटींचं पालन करणं सर्व कर्मचाऱ्यांना बंधनकारक राहील. त्याशिवाय सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग), मास्क, सॅनिटायझेशन यासारख्या बाबींचे पालन करणं आवश्यक राहील. 


हेही वाचा - 

Mumbai Local: मुंबई लोकलच्या ७०० फेऱ्या, केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा