आई फक्त तुझ्यासाठी!

 Barkat Ali Naka
आई फक्त तुझ्यासाठी!
Barkat Ali Naka, Mumbai  -  

वडाळा - अनुसया आर्ट्स प्रस्तुत मातृधारा काव्य वाचन आणि गजल वाद्यवृंद हा कार्यक्रम शुक्रवारी बरकत अली नाका येथे पार पडला. अभिनेता आणि गायक शिरीष पवार यांची आई अनुसया कोंडाजी पवार यांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या जन्मदात्या आईने आपल्यासाठी खूप काही केलं असून आज तिच्या स्मृती दिनानिमित्त तिला आदरांजली म्हणून हा मधुर गाण्यांचा कार्यक्रम आम्ही ठेवला आणि या पुढेही ठेऊ असं विजय पवार यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला अनेक मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात मातृप्रेमाची गाणी आणि नृत्य सादरीकरण करण्यात आलं.

Loading Comments