खाकीवरील हल्ल्यांविरोधात जनजागृती

 Sewri
खाकीवरील हल्ल्यांविरोधात जनजागृती
खाकीवरील हल्ल्यांविरोधात जनजागृती
खाकीवरील हल्ल्यांविरोधात जनजागृती
See all

गेल्या काही काळापासून पोलिसांवर होणा-या हल्ल्यांची संख्या सातत्याने वाढतेय. अशाच एका माथेफिरूनं केलेल्या हल्ल्यात वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांवर होत असलेल्या या हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि पोलिसांचं समाजातील महत्त्व पटवून देण्यासाठी वडाळा आणि शिवडी रेल्वे स्थानकांत नुकतीच जनजागृती मोहीम राबवण्यात आली. 

5 आणि 6 सप्टेंबर रोजी वडाळा आणि शिवडी रेल्वे स्टेशन परिसरात ही मोहीम रेल्वे पोलिस मित्र, गुरू तेग बहादूर कॉलेजचे विद्यार्थी, युवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते आणि महिला, रेल्वे कर्मचारी यांच्या सहभागाने संपन्न झाली. तसंच बरेचसे प्रवासीही 'कायद्याचं पालन करावं', 'पोलिसांवर हल्ले करू नयेत,' सार्वजनिक संपत्तीचं जतन करावं' अशा घोषणा देत या मोहिमेत सहभागी झाले.  

Loading Comments