बेस्ट कर्मचाऱ्यांची जनजागृती रॅली

 Parel
बेस्ट कर्मचाऱ्यांची जनजागृती रॅली
बेस्ट कर्मचाऱ्यांची जनजागृती रॅली
See all
Parel, Mumbai  -  

परळ - भोईवाडा बेस्ट कामगार वसाहत अॅलिटीज असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली होती. भोईवाडा बेस्ट वसाहत येथून निघालेली रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग दादर, दादर टीटी, दादासाहेब फाळके रोड, हिंदमाता वरून पुन्हा भोईवाडा वसाहत येथे फिरवण्यात आली. रॅलीत झाडे लावा झाडे जगवा, वीज वाचवा, पाणी वाचवा, धुम्रपान करू नका असे अनेक संदेश देण्यात आले. या जनजागृती रॅलीत बच्चे कंपनीही सहभागी झाली होती. गेल्या 10 वर्षांपासून ही रॅली काढण्यात येते, असेही सह चिटणीस विजय राजे यांनी सांगितले.

Loading Comments