Advertisement

धारवली पूल रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत


धारवली पूल रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत
SHARES

अरूंद रस्ता आणि एका वेळी एकच वाहन जाण्याएवढी जागा. ही स्थिती आहे मढ आयलंड ते मुंबई शहराला जोडणारा धारवली पुलाची. अरुंद पूलाच्या रस्त्यामुळे सतत होणारी वाहतुककोंडी, प्रवासाला लागणारा विलंब यामुळे या परिसरातील नागरिकांकडून धारवली पूलाच्या रुंदणीकरणाची मागणी होऊ लागली आहे. मढ आयलंड ते मुंबई शहराला जोडणारा भास्कर भोपी रोडवर धारवली पूल आहे. गेले 70 वर्ष जुना असलेल्या या पुलाच्या रुंदीकरणाकडे अद्याप कोणत्याच सरकारनं लक्ष दिले नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अरूंद पुलामुळे या गावातील स्थानिकांना अनेक समस्य़ांना सामोरे जावे लागते. मढ आयलंडवर दिवसेंदिवस होणारी पर्यटकांची गर्दी, शूटिंगसाठी येत असलेले कलाकार यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा