शनिवारवाड्यात विराजला फॅशन मार्केटचा राजा

 Churchgate
शनिवारवाड्यात विराजला फॅशन मार्केटचा राजा
शनिवारवाड्यात विराजला फॅशन मार्केटचा राजा
See all
Churchgate, Mumbai  -  

सीएसटी परिसरातील फॅशन मार्केटचा राजा यंदा पुण्याच्या प्रसिध्द अशा ऐतिहासिक शनिवारवाड्यात विराजमान झाला आहे. यंदा ह्या मंडळाचं 28 वं वर्ष आहे. दक्षिण मुंबईतील एम.जी. रोड येथील फैशन मार्केटमध्येच राजाचा मंडप बांधण्यात आला आहे. त्यामुळे या फॅशन स्ट्रीटवर शॉपिंगसाठी येणारी पावले नकळतच या फॅशन मार्केटच्या राजाच्या दर्शनाकडे वळतात. ऐतिहासिक अशा शनिवार वाडयासमोर अनेकजण सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत आहेत.फॅशन स्ट्रीटवरील चारशे दुकानांच्या वतीने या फॅशन मार्केटचा राजा विराजमान होत असल्याचे मंडळाची अध्यक्ष सुरेंद्र सिंग यांनी सांगितले.

Loading Comments