गोरेगाव स्टेशन मार्गावर चिखल

 Gateway of India
गोरेगाव स्टेशन मार्गावर चिखल
गोरेगाव स्टेशन मार्गावर चिखल
गोरेगाव स्टेशन मार्गावर चिखल
See all

हार्बर लाईनच्या स्टेशनचं बांधकाम सुरू असल्यानं गोरेगाव पश्चिमेकडून स्टेशनला येणारा मार्ग बंद झालाय. त्यामुळं परिसरात असलेल्या कच्च्या रस्त्यावरून प्रवाशांना रेल्वे स्टेशन गाठावं लागतंय. या रस्त्यावर ठिकठिकाणी दगड पडलेत. तसंच काही ठिकाणी चिखल आणि पाणी साचल्यानं येथून चालताना प्रवाशांना कसरत करावी लागतेय. गोरेगाव रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. एकवर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्यानं प्रवाशांना नाईलाजास्तव याच मार्गावरून जावं लागतंय. त्यामुळं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जातेय.

Loading Comments