Advertisement

महिला दिनानिमित्त सायबर सुरक्षेचे व्याख्यान


महिला दिनानिमित्त सायबर सुरक्षेचे व्याख्यान
SHARES

गोरेगाव - केशव गोरे स्मारक सभागृह येथे 'स्वाधार' या संस्थेतर्फे बुधवारी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने सायबर सुरक्षा या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

सायबर सुरक्षा आणि सोशल मीडियाचे तज्ज्ञ निखिल महाडेश्वर यांनी उपस्थित महिलांना आणि पुरुषांना व्हॉटस अॅप, फेसबुक, इंटरनेट या सोशल मीडियावर होणारी ऑनलाईन फसवणूक यावर मार्गदर्शन केले. त्यामुळे सोशल मीडियावर काही काम करताना ते पूर्ण वाचून लक्ष देऊन करावे जेणेकरून होणाऱ्या फसवणुकीला आळा बसेल. तसेच सिक्युर इंडिया फस्ट अॅन्टी हॅकिंग अॅप प्ले स्टोर वरून डाउन्डलोड केल्यास तुमची कोणतीच माहिती बाहेर न जता तुमचे सर्व व्यवहार सुरक्षित होतील, असेही महाडेश्वर यांनी उपस्थित श्रोत्यांना सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा