सावधान ! या गटारामुळे जीव जाऊ शकतो

दहिसर - दहिसर पूर्व परिसरातील बनत असलेल्या मनपा कार्यालायाजवळील गटाराचे स्लॅब तुटल्याने येथून ये जा करणा-या पादचा-यांना धोका निर्माण झाला आहे. दहिसर पूर्व चेकनाका प्रवेशद्वार येथून विरारच्या दिशेने जाणा-या रस्त्याशेजारून एक गटार वाहते. परिसरातील सांडपाण्याच्या निच-यासाठी हे गटार येथील मोठ्या नाल्याला जोडण्यात आलेले आहे. मात्र गटाराचा स्लॅब तुटला असून, खबरदारीचा उपाय म्हणून तुटलेल्या स्लॅबवर प्लायवुडचा तुकडा ठेवण्यात आला आहे. या गटारावरून पादचारी आणि वाहनांची ये जा सुरू असते, त्यामुळे येथे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Loading Comments