झाड कोसळून तीन वाहनांचे नुकसान

  Chembur
  झाड कोसळून तीन वाहनांचे नुकसान
  मुंबई  -  

  चेंबुर - दोन दिवसांपासून मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी चेंबूरच्या टिळकनगरमध्ये रस्त्याच्या मध्येच एक जुने झाड अचानक कोसळले. या झाडाखाली काही रहिवाशांनी त्यांचे वाहने पार्क केली होती. त्यामुळे यामध्ये दोन कार आणि एक दुचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी येथील रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. रहिवाशांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हे झाड बाजूला करत येथील वाहतूक सुरळीत केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.