भांडुपमध्ये डेरीला भीषण आग

 Mumbai
भांडुपमध्ये डेरीला भीषण आग

भांडुप - दूध डेरीला भीषण आग लागलेली आग आता पूर्णपणे विझली आहे. भांडुप (प.) च्या कोकणनगरमध्ये गुरुवारी रात्री 10.15 च्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दूध डेरी संपूर्णपाने जळून खाक झाली आहे. डेरीमधील यंत्र सामग्री आणि लाकडी सामान जाळून खाक झाले आहे.

Loading Comments