'लालबागचा राजा'च्या भक्तांना मोफत अल्पोपहार

  Mumbai
  'लालबागचा राजा'च्या भक्तांना मोफत अल्पोपहार
  मुंबई  -  

  लालबाग - लालबागचा राजाच्या दर्शनाला लाखो भाविक येत असतात. या भाविकांना 'नारायण उद्योग भवन सोसायटी'च्या वतीने 11 दिवस मोफत अल्पोपाहार देण्यात येत आहे. सोसायटीकडून गेल्या 11 वर्षांपासून गणेशोत्सवाच्या कालावधीत हा भाविकांना अल्पोपहार देण्यात येत आहे.

  नारायण उद्योग भवन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गुप्ता, सचिव हिरेन विरा, खजिनदार राजकुमार शाह, उपाध्यक्ष अरविंद मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य अविरतपणे सुरू आहे. या उपक्रमात बिस्किटे, चहा व पाणी आदीचे मोफत वाटप करण्यात येते."11 वर्षांपूर्वी सामाजिक भावनेने लालबागचा राजाच्या भक्तांना मोफत अल्पोपाहार देण्याचा विचार मांडला व सर्व सभासदांनी त्यास अनुमती दिली. गणेशभक्त 10 -15 तास रांगेत उभे राहतात. त्यांना आपण मोफत अल्पोपाहार देऊन सेवा करावी, असे मनोमन वाटल्याने हे दातृत्वाचे कार्य आरंभले," असे गुप्ता यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.