पालिकेला पडलाय स्वच्छतेचा विसर

  Santacruz
  पालिकेला पडलाय स्वच्छतेचा विसर
  मुंबई  -  

  साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न होत असतात. त्यासाठी पालिकेकडून जनजागृतीची मोहीमही राबवण्यात येते. पालिकेचे 'स्वच्छता मार्शल' कचरा फेकणाऱ्या नागरिकांकडून दंडही घेतात. पण याच पालिका प्रशासनाला परिसर स्वच्छतेचा मात्र पुरता विसर पडला आहे.सांताक्रूझ पूर्व शिवाजीनगर येथील वाकोला नाला परिसरात ठेवण्यात आलेल्या कचरापेट्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होत आहे. त्यामुळे जनजागृती करण्यासोबतच पालिकेने कचरापेट्यांमध्ये पाणी साचणार नाही, याचीही काळजी घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.