सर जेजे हॉस्पिटलच्या कामगार वसाहतीतील डी ब्लॉक येथील शौचालयाची दुरुस्ती करण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या विशेष निधीतून हे काम करण्यात आले आहे. बुधवारी रात्री नुतनीकरण करण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी मनोज जामसुतकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.