धारावीला जाऊया; कागदाचा गणपती पाहूया

 Mumbai
धारावीला जाऊया; कागदाचा गणपती पाहूया
धारावीला जाऊया; कागदाचा गणपती पाहूया
See all
Mumbai  -  

धारावी - धारावीत कागदाची गणेशमूर्ती गणेशभक्तांचे आकर्षण ठरत आहे. येथील इलेव्हन एव्हिल्स क्रिकेट क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बालकलाकारांनी कागदापासून ही 6 फुटी गणेशाची मूर्ती साकारली आहे.तसेच या मंडळाने 'भेसळखोर' या विषयावर आधारित पर्यावरणपूरक देखावा तयार करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.कागदाचा गणपती तसेच आकर्षक देखावा पाहण्यासाठी धारावीसह बाहेरून गणेश भक्तांची येथे गर्दी होत आहे. तसेच मंडळातील बालकलाकारांच्या कलाकारीचे सर्वत्र कौतुक होत आहे."सजावट पाहण्यासाठी उडालेली झुंबड पाहून मंडळातील कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे वाटत आहे," असे मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण घानेल्लू यांनी सांगितले. हे मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम राबवित असून, अनेक सामाजिक संस्थानी त्याचा गौरव केला आहे.

Loading Comments