पालिका कार्यालयाबाहेरच रस्त्याचे खोदकाम

  Chembur Railway Station
  पालिका कार्यालयाबाहेरच रस्त्याचे खोदकाम
  मुंबई  -  

  चेंबूर - एकीकडे पालिका निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच चेंबूरमधील पालिकेच्या एम पश्चिम कार्यालयाबाहेरच मोठ्या प्रमाणात पालिकेने खोदकाम करून ठेवले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच चेंबूरमधील हे पालिका कार्यालय चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना देखील या परिसरातून जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

  पालिकेकडून या ठिकाणी नवीन पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम सुरु आहे. आठवड्याभरापूर्वी हे काम सुरु करण्यात आले होते. मात्र चार दिवसांपासून हे काम बंद आहे. त्यामुळे हा त्रास कधीपर्यंत सहन करायचा असा प्रश्न स्थानिकांना पडलाय.

  चेंबूरमध्ये बाराही महिने अशा प्रकारे पालिकेकडून खोदकाम सुरु असते. त्यामुळे चेंबूरकरांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत मी अनेकदा पालिका आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यांच्याकडून काहीही करवाई करण्यात आली नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.