'धोकादायक' पोलीस स्टेशन

 Chembur
'धोकादायक' पोलीस स्टेशन
'धोकादायक' पोलीस स्टेशन
See all

चेंबुर - दिवस- रात्र डोळ्यात तेल घालून मुंबईकरांचे रक्षण करणारे पोलिसच सध्या जीव मुठीत धरुन काम करत असल्याचं समोर आलं आहे. चेंबुरमधील पोलीस ठाण्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने पोलीस जखमी होण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. गेल्या 30-40 वर्षांपासून या पोलीस ठाण्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. याबाबत अनेकदा पत्र देऊनही बांधकाम खात्याकडून काहीच उपाययोजना होत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी एक पोलीस अधिकारी डोक्यावर स्लॅब कोसळून जखमी झाले होते आणि त्यांना गंभीर दुखापत झाली होती. स्टेशन हाउस आणि संगणक कक्षामध्येच अधिकारी आणि तक्रार देण्यासाठी आलेले नागरिक बसलेले असतात. मात्र पोलीस ठाण्याच्या आवारात पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने जीव मुठीत धरुन पोलिसांना याठिकाणी काम करावे लागत आहे. 

Loading Comments