चित्रनगरीच्या कारभाराविरोधात आंदोलन

 Malad West
चित्रनगरीच्या कारभाराविरोधात आंदोलन

गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील गचाळ कारभाराविरोधात बुधवारी रिपब्लिकन चित्रपट सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी चित्रनगरीचा गचाळ कारभार, मागासवर्गीयांवर होत असलेला अन्याय, दिली जाणारी अपमानास्पद वागणूक यांचा आंदोलनातून निषेध करण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व कामगार नेते रमेश मा. जाधव, अध्यक्ष सुनील कांगे, संदेश काळे यांनी केले.

Loading Comments