राधे माँ पुन्हा अडचणीत

राधे माँ उर्फ सुखविंदर कौरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तिने व्यापारी मनमोहन गुप्ता आणि त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गुप्तांनी याप्रकरणी तक्रार करत बोरिवली पोलिसांत भादवी कलम 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. गुप्ता हे मालाडच्या एमएम मिठाईवा​ला या दुकानाचे मालक आहेत. काही काळी गुप्ता कुटुंबियाचे राधेसोबत घनिष्ट संबंध होते.  मिळालेल्या माहितीनुसार गुप्तांनीच राधेला पंजाबच्या गुरूदासपूरमधून मुंबईत आणले होते. तसेच देवीचे अवतार असल्गयाचे राधेला प्रसिद्धी मिळवून दिल्याचेही गुप्तांनी सांगितले. 

Loading Comments