देखाव्यातून दिला जलसंवर्धनाचा संदेश

Sewri
देखाव्यातून दिला जलसंवर्धनाचा संदेश
देखाव्यातून दिला जलसंवर्धनाचा संदेश
See all
मुंबई  -  

यावर्षी पडलेल्या भीषण दुष्काळामुळं पाण्याचं महत्त्व सगळ्यांना समजलं. त्याचाच धागा पकडत शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानंही आपल्या देखाव्यातून जलसंवर्धनाचा संदेश दिलाय. 

यावर्षी 65 वर्षं पूर्ण करणा-या या मंडळानं  'जलसंवर्धन' या संकल्पनेवर आधारित 'याला जीवन ऐसे नाव' हा वास्तवदर्शी देखावा साकारलाय. प्रत्येक सजीवाचं अस्तित्व म्हणजे पाणी...! पृथ्वीवरील अमृत म्हणजे पाणी...!! पाणी म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे पाणी; जीवनातील पाण्याचे महत्व सांगणारा हा 8 मिनिटांचा चलचित्र देखावा तयार करण्यात आला आहे. "एक जबाबदार नागरिक म्हणून हा त्रिसुत्री कार्यक्रम राबवायला हवा. तो म्हणजे, पाण्याचा एक एक थेंब ताब्यात घ्या; मिळवलेले पाणी काटकसरीने वापरा आणि वापरलेले पाणी पुन्हा पुन्हा वापरा, असा संदेश या देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे," असं मंडळाचे अध्यक्ष विजय इंदुलकर यांनी सांगितलं. 
गतवर्षी मंडळानं शिवडीचा राजा ज्ञान प्रबोधिनी या पुस्तक पेढीची स्थापना करून शैक्षणिक उपक्रम हाती घेतलाय. त्यातून गरजू विद्यार्थ्यांना 8 वी ते उच्च शिक्षणाची पुस्तकं सवलतीच्या दरात दिली जातात. 

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.