मुलुंडमधील नाणेपाडा परिसरातील रेल्वे रुळांलगतच्या संरक्षक भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. या भिंतीला लागूनच मुलुंड पूर्वेकडील नानेपाडा परिसर आहे. त्यामुळे येथे बरीच वर्दळ असते. येथून ये जा करणारे बरेच लोक जीवाची पर्वा न करता संरक्षक भिंतीला पडलेल्या भगदाडामधून रेल्वे रूळ ओलांडतात. यामुळे मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन या भिंतींची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.