Advertisement

बाल साहित्यातील प्रयोगशीलतेचे मूल्यमापन


बाल साहित्यातील प्रयोगशीलतेचे मूल्यमापन
SHARES

दादर - साहित्य अकादमी सभागृहात 'गेल्या 25 वर्षातील बाल साहित्यातील प्रयोगशीलतेचे मूल्यमापन' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. 1990पासून सुरू झालेल्या बाल साहित्याचा प्रवास ते आतापर्यंत अश्या 25 वर्षांमध्ये घडत गेलेल्या अनेक प्रयोगशील बदलांचा आढावा या वेळी घेण्यात आला. भाषाशैली, विषय, आशय, रचना तंत्र, प्रतिमा, बाल साहित्याच्या कक्षा इत्यादी गोष्टींमध्ये होणार बदल आणि 21 व्या शतकातील बाल साहित्याचे चित्र यामध्ये किती अंतर आहे हे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत पाटणकर, राजीव तांबे यांनी कशाप्रकारे बाल साहित्यातून एक प्रयोगशीलता साधली याची अनेक उदाहरणे देण्यात आली. या चर्चासत्रात मराठी साहित्यिक अनंत भावे, राजीव तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा