पोलीस वसाहतीचे स्लॅब कोसळून तरुण जखमी

 Kurla
पोलीस वसाहतीचे स्लॅब कोसळून तरुण जखमी
पोलीस वसाहतीचे स्लॅब कोसळून तरुण जखमी
See all
Kurla, Mumbai  -  

पोलीस अधिकाऱ्यांच्या छताचा प्लास्टर कोसळून एक तरुण जखमी झाल्याची घटना कुर्लातल्या नेहरूनगरमध्ये घडली आहे. तरुणाचे नाव कुणाल बनसोडे असे असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भायखळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले किशोरकुमार बनसोडे हे आपल्या कुटुंबियांसह गेल्या अनेक वर्षांपासून येथे राहत आहेत. या वसाहतीची मोठी दुरवस्था झाली असून प्रत्येक महिन्याला अशा प्रकारच्या घटना घडतच असतात. बनसोडे हे कामावर जात असताना दुपारच्या दरम्यान त्यांच्या घरातल्या बेडरुममधील स्लॅब अचानक कोसळला. यामध्ये त्यांचा मुलगा कुणाल जखमी झाला. गेल्या महिनाभरातील या इमारतीतली ही दुसरी घटना असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Loading Comments