भायखळ्यातील बाबुराव जगताप मार्गावरील गतिरोधक मुसळधार पावसामुळे वाहून गेलाय. या गतिरोधकाची खडी रस्त्यावर पसरल्यानं वाहनचालकांची वाहनं घसरून अपघात होत आहेत. याच परिसरात बापूराव जगताप उर्दू शाळा आहे. गतिरोधक नसल्यानं या रस्त्यावरून दुचाकीस्वार भरधाव वेगानं जात आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतोय.