'परतवारी' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

  vile parle
  'परतवारी' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
  मुंबई  -  

  विले पार्ले - सुधीर महाबळ लिखित 'परतवारी' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 5 मार्चला 5.30 वाजता विले पार्लेतल्या डहाणूकर कॉलेजमध्ये होणार आहे. पुणे मनोविकास प्रकाशन यांच्या वतीने याचे आयोजन केले आहे. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानिमित्ताने डॉ. रवीन थत्ते आणि शरद काळे या प्रमुख वक्त्यांचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू आणि अच्युत गोडबोले यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. 'परतवारी' पुस्तकातून लेखकाला प्रवासात भेटलेली माणसं, निसर्ग, छोट्याछोट्या गोष्टीतून मिळालेले नवे धडे, माणसातला स्वार्थ आणि परमार्थ अशा अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.