होतकरू मुलांना शिक्षणासाठी 'सहयोग'

 Borivali
होतकरू मुलांना शिक्षणासाठी 'सहयोग'
Borivali, Mumbai  -  

सहयोग प्रतिष्ठानातर्फे होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आलाय. शक्ती सेवा संघ संचालित मोरेश्वर भोईर शिक्षण केंद्रात शिकणाऱ्या १९ मुलामुलींना घरच्या परिस्थितीमुळे शाळेची फी भरण्यास अडचण येत होती. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता होती. यासाठी मुख्यध्यापिका वंदना सावंत यांनी सहयोग प्रतिष्ठानकडे या मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न मांडला. त्यावर लगेच प्रयत्न करून सहयोग प्रतिष्ठाननं मुलांना एक लाख पंच्यांशी हजारची मदत केली. 

Loading Comments