Advertisement

कचऱ्याच्या ढिगामुळे शिवडीकर त्रस्त


कचऱ्याच्या ढिगामुळे शिवडीकर त्रस्त
SHARES

शिवडी - मुंबईत रोज जमा होणा-या हजारो टन कच-याची विल्हेवाट लावणे दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत चालले आहे. शिवडी पश्चिम परिसरातही कचऱ्याच्या वाढत्या ढिगाऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.  
 शिवडी पश्चिम येथील राहुलनगर हा पूर्णत: झोपडपट्टी असलेला परिसर आहे. या भागामध्ये बऱ्याच प्रमाणात भाजी, मासळी विक्रेते व्यवसाय करतात. या भाजीचा कचरा आणि प्रत्येक घराघरातून जमा होत असलेला कचऱा, तसेच मासळी बाजारातील कचरा यामुळे दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या या भागामध्ये उग्र होत चालली आहे. कच-याच्या ढिगामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. 
येथे जमा होणाऱ्या कचऱ्याच्या तुलनेत कचराकुंड्या अपुऱ्या पडत आहेत. परिणामी कचरा बाहेर सांडतो. हा कचरा महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी वेळेत उचलला नाही तर परिसर अस्वच्छ दिसतोच. शिवाय त्याच जागी कचरा कुजून संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरून डासांची पैदासही होत आहे. त्यामुळे परिसरात रोगराईच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा