वरळी पोलीस लाईनमध्ये कचराचे साम्राज्य

BDD Chawl
वरळी पोलीस लाईनमध्ये कचराचे साम्राज्य
वरळी पोलीस लाईनमध्ये कचराचे साम्राज्य
See all
मुंबई  -  

वरळी-  वरळीतील बी.डी.डी. चाळ पोलीस लाईन परिसरात महापालिकेच्या कचरा पेटी ठेवण्यात आल्या आहेत पण ह्या कचरा पेटीतील कचरा हा वेळेवर घेऊन जात नसल्याचं स्थानिकांनी म्हटलंय. हा रहदारीचा परिसर आहे. तळ मजल्यावरील घरा शेजारीच ही कचरा पेटी असल्यामुळे तेथील रहीवाश्यांना मच्छर, दुर्गंधी मलेरीया ,डेंग्यूसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहेत. येथील कचरा पेटी ही हलवण्यात यावी अशी मागणी रहिवाश्यांनी अर्जाद्वारे केलीय. स्थानिकांनी अनेकदा महापालिकेला तक्रार करुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे, ह्यामुळे तेथे पावसाळ्यात अनेक साथीच्या रोगाचा त्रास तसेच डेंग्यू मलेरिया सारख्या आजार पसरण्याची शक्यता आहे. 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.