Advertisement

'काळा घोडा फेस्टिव्हलला' या ५ कारणांसाठी भेट द्या

मुंबईकरांमध्ये काळा घोडा फेस्टिव्हलची जबरदस्त क्रेझ आहे. अशा काळा घोडा फेस्टिव्हलला तुम्ही भेट दिली की नाही? जर नसेल या ५ कारणांसाठी तुम्ही काळा घोडा फेस्टिव्हलला नक्की भेट द्या.

'काळा घोडा फेस्टिव्हलला' या ५ कारणांसाठी भेट द्या
SHARES

दरवर्षी मुंबईकर काळा घोडा फेस्टिव्हलची आतुरतेनं वाट पाहतात. १९९९ साला पासून सुरवात झालेल्या या काळा घोडा आर्ट महोत्सवलचे यंदा २१ वे वर्ष आहे. गेली २१ वर्ष संगीत, नाट्य, कला अशा विविध क्षेत्रातील कला सादर करण्याचा योग कलाकारांना मिळतो. एकप्रकारे कलाकारांना आपली कला दाखवण्याचं हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे

तुम्ही काळा घोडा फेस्टिव्हलला भेट दिली का? जर नसेल या ५ कारणांसाठी तुम्ही काळा घोडा फेस्टिव्हलला भेट द्या.


) कला

अमी पटेल, गीता कॅस्टेलिनो, सोनल मोटला आणि वर्षा कराळे यांनी तयार केलेल्या कलांचा अविष्कार तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. रुपाली पाटोले यांची 'ओव्हर दी टॉप - बचपन बचाओ' ही एक आकर्षक कलाकृती आहे. धागा नावाची देखील एक कलाकृती आहे. ज्यात मनुष्य आणि देव यांच्यातील नैसर्गिक संबंध दाखवण्यात आला आहे

'स्विंग फॉरवर्ड, फॉरवर्ड अ लॉस्ट चाइल्डहुड' अशी देखील एक कला दाखवण्यात आली आहे. प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांच्या थीमला बर्‍याच कलाकारांनी आपल्या कलेतून दाखवलं आहे. अशा बऱ्याच कला तुम्हाला इथं पाहता येतील. ज्याचं सामाजिक आणि पर्यावरण दृष्ट्या अधिक महत्त्व आहे


) डांस

विविधतेच्या बाबतीत नृत्यही मागे नाही. भरतनाट्यमपासून ते हिप-हॉपपर्यंत आणि फ्लेमेन्को आणि कथक यांच्या संगमापर्यंतही अनेक प्रकारचे डांस प्रकार इथं पाहायला मिळणार आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट डांस ग्रुपपैकी एक ग्रुप आहे तो म्हणजे किंग्स स्क्वाड. अदिती मंगलदास यांच्या कथ्थकची जादू देखील महोत्सवात पाहता येईल

महोत्सवात लोकनृत्याचा समावेश देखील करण्यात आला आहे. यंदा लोकनृत्यामध्ये तान्य सक्सेना विविध भावना भरतनाट्यमच्या माध्यमातून सादर करणार आहेत. त्यामुळे या लोकनृत्याला पाहण्यासाठी तुम्ही हजेरी लावू शकता.


) संगीत

जुने हिंदी संगीत किंवा जॅझ आणि हिप हॉप ऐकणाऱ्यांसाठी हा फेस्टिव्हल पर्वणीच आहे. पार्श्वगायिका जोनिता गांधी तिच्या बँडसह गाणी सादर करणार आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रेमींना वादक तौफिक कुरेशी किंवा अमान अली बंगाश आणि अयान अली बंगाश यांचे सितार गायन ऐकण्याची संधी उपलब्ध आहे

संगीत विभागात जेरी पिंटो, नीना गोपाल असे अनेक कलाकार असमानतेची वागणूक, ईशान्येतील कविता, स्थापत्य कलेतील अवकाश आणि त्याचा प्रभाव अशा विषयांवर चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या हस्ते कैफी आझमी यांच्या जन्मशताब्दी निमित्त खास कवितांच्या आवृत्ती, आणि उषा उत्तप यांचे आत्मचरित्र यासह अनेक पुस्तक प्रकाशन सोहळे पार पडणार आहेत.


) चर्चासत्र

तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायला आवडत असेल तर तुम्ही काळा घोडा फेस्टिव्हलला नक्की भेट द्या. विक्रम बावा, महाबानू मोदी-कोतवाल, डॉ. कैजाद कोतवाल आणि अंतरा बॅनर्जी यांच्या पॅनेल चर्चेला नक्की उपस्थित रहा

अन्नाची नासाडी आणि कचरा व्यवस्थापन या विषयावर देखील चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. शेफ आणि मिक्सोलॉजिस्ट अरिना सुचदे, शेफ मोइना ओबेरॉय, सुमित गंभीर, नेबरहुड हॉस्पिटॅलिटीचे डायरेक्टर आणि को-फाउंडर आणि शहरी कचरा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या मोनिषा नरके यांच्या चर्चा सत्रात भाग घ्या


) स्टँड अप कॉमेडी

महोत्सवामध्ये हास्यकल्लोळ माजविण्यासाठी अबीश मॅथ्यू, कनीझ सुरकास, गुरसिमरन खंबा अशी कॉमेडी विश्वातील दिग्गज मंडळींची हास्य जत्रा अनुभवाला मिळणार आहे.हेही वाचा

कला, संगीत आणि नृत्याचा अविष्कार म्हणजे 'काळा घोडा फेस्टिव्हल २०२०'संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा