रायगडावरचा ढोलवादनाचा कार्यक्रम रद्द

 Mumbai
रायगडावरचा ढोलवादनाचा कार्यक्रम रद्द
Mumbai  -  

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने राज्य सरकारने रायगडावर १००० ढोल वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावर जोरदार टीका करण्यात आली. 

11 एप्रिल रोजी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने पुण्यतिथीच्या दिवशी एक हजार ढोल वादनाचा कार्यक्रम रायगडावर आयोजित केला होता. त्यासाठी ढोल ताशा मंडळाने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे यासाठी सांस्कृतिक विभागाने आवाहन केले होते. तसेच नाव नोंदणी व्हावी यासाठी दुरध्वनी क्रमांकही जाहीर केला होता. मात्र शिवाजी महाराजांना चुकीच्या प्रकारे आदरांजली वाहिली जात असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागली. त्यामुळे ढोल ताशांचा कार्यक्रम अखेर राज्याच्या सांस्कृतिक विभागाला मागे घ्यावा लागला.

महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी ढोल वादन कसे केले जाऊ शकते असा सवाल उपस्थित केला गेला. शिवाय एक हजार इतक्या मोठ्या संख्येने ढोल वाजवले गेल्यास होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला कोण जबाबदार असेल असाही प्रश्नही विचारला गेला. त्यामुळे अखेर सांस्कृतिक विभागाला माघार घेत हा ढोलवादनाचा कार्यक्रम रद्द करावा लागला.   

 . 

Loading Comments