भायखळ्यात अखंड हरिनाम सप्ताह

 Ghodapdeo
भायखळ्यात अखंड हरिनाम सप्ताह
भायखळ्यात अखंड हरिनाम सप्ताह
भायखळ्यात अखंड हरिनाम सप्ताह
भायखळ्यात अखंड हरिनाम सप्ताह
See all
Ghodapdeo, Mumbai  -  

भायखळा - घोडपदेव येथील कापरेश्वर महाराज उत्सव मंडळाच्या वतीनं कापरेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या हरिनाम सप्ताहामध्ये महाराष्ट्रभरातून नऊ भजन मंडळं भजन करणार आहेत. आळंदी, तुकारामवाडी, बेळगाव, ओतूर, सोलापूर, त्रंबकेश्वर आणि बारामती येथून भजनी मंडळ इथे येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कापरेश्वर महाराज उत्सव मंडळ हरिनाम सप्ताहाचे आयोजन करत आहे. हा हरिनाम सप्ताह 18 मार्चपासून सुरु झाला असून, 27 मार्चला या सप्ताहाची सांगता होणार आहे.

Loading Comments