'स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या'

 lalbaug
'स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या'

लालबाग - स्वातंत्र्यवीर सावरकरांची 51 वी पुण्यतिथी रविवार 26 फेब्रुवारीला आहे. त्यानिमित्ताने शुक्रवारी लालबाग येथील गुरुकूल स्कुल ऑफ आर्टच्या 40 बालचित्रकारांनी एकत्र येऊन स्वा. सावरकरांची विविध चित्रं रेखाटली असून या चित्रांद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 'सावरकरांना भारतरत्न द्या' अशी मागणी केली आहे. सदरील सर्व चित्र पंंतप्रधान कार्यालयात पोस्टाद्वारे पाठवण्यात येणार आहेत. असे गुरुकूल स्कुल ऑफ आर्टचे संचालक सागर कांबळी यांनी सांगितले.

Loading Comments