बालकलाकारांच्या कलाकृतींना वाव

 Mumbai
बालकलाकारांच्या कलाकृतींना वाव
बालकलाकारांच्या कलाकृतींना वाव
बालकलाकारांच्या कलाकृतींना वाव
बालकलाकारांच्या कलाकृतींना वाव
बालकलाकारांच्या कलाकृतींना वाव
See all

दादर- मुलांना रंग संगती कळावी, त्यांना आवड असलेली चित्रकला शास्त्रशुद्धपणे शिकता यावी, कलेची आवड जपताना त्यामधील छोट्या छोट्या गोष्टींचा सकोल अभ्यास प्रत्येक चित्रकाराला करता यावा यासाठी वर्षभर दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात चित्रकलेचे वर्ग घेतले जातात. लहान मुले आणि महिलांनी या दरम्यान वर्षभर काढलेल्या निवडक चित्रांचे प्रदर्शन 24 फेब्रुवारी पासून 26 फेब्रुवारी पर्यंत भरवण्यात आले होते. चित्र म्हणजे फक्त मानव आकृतीच नव्हे तर अनेक प्रकारच्या लहान मोठ्या आकाराच्या रेषा आणि बिंदू एकत्र आले तर एका विशेष चित्राची निर्मिती होते हे दाखवणारे लहानग्यांचे चित्र प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आले होते.

3 दिवसीय या चित्रप्रदर्शनाला कला रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. बड्या चित्रकारांना ज्याप्रमाणे प्रसिद्ध गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन लावण्याची संधी मिळते त्याचप्रमाणे या लहानग्यांच्या कलेला सर्वांनी दाद द्यावी, त्यांच्या कलेचे कौतूक व्हावे यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या पहिल्या मजल्यावर आणि स्मारक परिसरात या कलाकृतींचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

या प्रदर्शनात अगदीच बिंदू आणि रेषा काढू शकणाऱ्या कलाकारापासून ते उत्तम डिझाईन आणि मानव आकृती काढू शकणाऱ्या त्या प्रत्येक कलाकाराच्या कलेला या प्रदर्शनात व्यासपीठ देण्यात आल्याचे यावेळी पहायला मिळाले. या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे पदर्शन विनामूल्य ठेवण्यात आले होते.

Loading Comments