लैंगिक अत्याचारांचा 'चित्रनिषेध'

 Mumbai
लैंगिक अत्याचारांचा 'चित्रनिषेध'

लालबाग - अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. 'लालबाग-परळ गुरुकुल स्कुल ऑफ आर्ट'च्या चित्रकारांनी या घटनांचा चित्राच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे. ईशान्य मुंबईतील मुलुंडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करून हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. अल्पवयीन मुली आणि महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराला पूर्णविराम देण्यासाठी सरकारने फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा, आरोपींना कडक शिक्षा द्यावी यासह आरोपींना पॅरोलवर सोडू नये आणि कराटे, ज्यूडो यांसारखे प्रशिक्षण मुलींना शाळातून द्या, अशी मागणी या चित्रांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Loading Comments