Advertisement

दादरमध्ये रंगला 'साहित्य - रंग'


दादरमध्ये रंगला 'साहित्य - रंग'
SHARES

दादर - मराठी भाषा आणि मराठी साहित्याचे संवर्धन व्हावे तसेच नवोदितांना व्यासपीठ मिळावं यासाठी 'साहित्य - रंग' या कार्यक्रामाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोकण मराठी साहित्य परिषद दादर शाखा आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा यांच्या वतीने शनिवारी दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

साहित्य आणि काव्यकला ही आत्मकलेतून निर्माण झाली आहे. मात्र या कलेला संजीवनी देण्याचे काम मराठी भाषेने केले आहे. त्यामुळे मराठी भाषाही कल्पनेच्या भरारीने नव्हे तर त्याची पाळं-मुळं खोलवर रुजली गेली पाहिजेत असा सल्ला कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या कवयित्री रेखा नार्वेकर यांनी दिला. तर पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्ष झाले असल्याचे मत कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी व्यक्त केले.

या वेळी कवी प्रा. पंढरीनाथ रेडकर, सूर्यकांत मालुसरे, कवयित्री गौरी कुलकर्णी, ज्योती कपिले, कवी एकनाथ आव्हाड आदी उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा