नववर्षाचं कीर्तनानं स्वागत

  Mumbai
  नववर्षाचं कीर्तनानं स्वागत
  मुंबई  -  

  घाटकोपर - लक्ष्मीनगर मधील स्नेहसदन गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं नव वर्षानिमित्त गुरुवारी सायंकाळी ८ वाजता कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्याच्या वारकरी प्रबोधन समितीचे अध्यक्ष आणि कीर्तनकार ह.भ.प. श्रीगुरू संतदास महाराज मनसुख यांनी हे कीर्तन केलं. या कार्यक्रमात वयोवृद्धांबरोबरच तरुण पिढीनंही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. लक्ष्मीनगर गोविंदा पथकाचे अध्यक्ष राजेश राणे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.